शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (10:40 IST)

माधुरी-आमिरच्या ‘दिल'चा रिमेक येणार?

नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘दिल'. आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तुफान गाजला होता. केवळ चित्रपटच नाही तर, यातील गाणीदेखील तितकीच लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. लवकरच याचा रिमेक येणार असल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्रकुमार यांनी ‘दिल'चा रिमेक काढण्याचा मानस व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा दिल पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या रिमेकविषयी फारशी माहिती अद्याप समोर आली नसून यात नेमके कोणते कलाकार झळकणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही. 
 
‘दिल'च्या रिमेकची कथा ही थोडीफार ‘दिल'प्रमाणेच असणार आहे. मात्र, संहितेमध्ये काळानुरूप काही बदल करण्यात येणार आहेत. तसेच आमिर आणि माधुरी यात झळकणार की नाही हे आप गुलदस्त्यात आहे. सध इंद्रकुमार ‘थँक गॉड' या चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर इंद्रकुमार ‘दिल'च्या रिमेककडे वळणार असल्याचे सांगण्यात येत आहे..