बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (07:46 IST)

'या' गावातल्या ग्रामस्थांनी चक्क मगर खांद्यावर उचलली

सांगलीतील ग्रामस्थ आणि तरुण युवकांनी फारच मोठ आणि जिवावर येणार धाडस करून दाखवल आहे.  वाळवा तालुक्यातील साटपेवाडी गावी  येथील ग्रामस्थांना खांद्यावरुन चक्क मगर नेली.  या सर्व ग्रामस्थांनी खतरनाक अशी  12 फूट मगर पकडली होती. मात्र कोणताही अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी हे ग्रामस्थांनी धाडस केलं असे समोर आले आहे.
 
ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे  मगर आढळून आली. ही मगर पकडत  कोणतेही अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि युवकांनी अथक प्रयत्नांतून वन विभागाकडे सुपूर्द केली.
 
मागील काही दिवसांपासून कृष्णेच्या काठी मोठ्या प्रमाणावर अजस्त्र मगरी दर्शन देत आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात  दहशतीचे वातावरण पसरल होते. तेव्हा सांगली जिल्ह्यातील सटपेवाडी येथे ग्रामस्थांना तब्बल दहा ते बारा फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले. तेव्हा ग्रामस्थांनी आणि गावातील युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद केले. त्यानंतर ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरुन मगरील घेऊन जात वन विभागाच्या ताब्यात दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नैसर्गिक आदिवासात सोडून दिले आहे.