1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (12:54 IST)

डबलरोलमध्ये दिसणार रितिक

दक्षिण भारतातील सुपरहिट फिल्म विक्रम वेधा चा हिंदी रिमेक लवकरच बनवला जाणार आहे. यात रितिक रोशन असणार आहे ही गोष्ट आता निश्चित झाली आहे. रितिक या सिनेमातून डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. 
 
या सिनेमात रितिक डबल रोलमध्ये असेल. त्याचा रोल नेहमीप्रमाणे स्टायलिश, हँडसम आणि डॅशिंग असेल तर दुसरा रोल अतिशय खतरनाक गँगस्टरचा असेल. या सिनेमाचे डायरेक्शन पुष्कर गायत्री करणार आहेत. त्यांनची ओरिजनल सिनेमा दिग्दर्शित केला होता.
 
व्रिकम वेधा साठी आधी आमिर खानची निवड करण्यात आली होती. मात्र त्याच्या बरोबरची बोलणी फिसकटली आणि रितिकचे नाव निश्चित झाले. रितिकबरोबर सैफ अली खान देखील या सिनेमात असणार आहे.