शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (13:00 IST)

'राधे-श्याम'चा टिझर 14 फेब्रुवारीला

प्रभासच्या ‘राधे श्याम'ची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. याची पटकथा एका प्रेमकथेवर आधारित असून प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याच्या पोस्टरनंतरच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर 14 फेब्रुवारीला रिलीज करण्यात येणार आहे. याचे दिग्दर्शन राधा कृष्णा कुमार यांनी केले असून तो विविध भारतीय भाषांत प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचे शूटिंग गतवर्षी मे महिन्यात पूर्ण झाले होते. पण लॉकडाउनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. त्यामुळे आता या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. 
 
‘राधे-श्याम' ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचे बोलले जात आहे. यात प्रभास, पूजासह सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूरसहीत इतर  अनेक कलाकारांचा समावेश आहे. प्रभास चित्रपटात एका टेलरची भूमिका साकारत आहे, तर पूजा हेगडे राजकुमारीच्या भूमिकेत दिसू शकते. चित्रपटाच्या कथेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी  खूपच गुप्तता पाळल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादसह युरोपमध्ये अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. याशिवाय या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण जॉर्जियात  करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.