इरफानच्या कोब्रा चित्रपटाचा टीझर चर्चेत

cobra
Last Modified बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:21 IST)
माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. इरफान पठाण दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत ‘कोब्रा' या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या या चित्रपटाची निर्मिती ललित कुमार यांनी केली आहे. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे रिलीज डेट टळली होती. त्यामुळे इरफानचा अभिनय पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये लागून राहिली होती. इरफानचा अभिनय चाहत्यांच्या कितपत पसंतीस उतरतो, हेचित्रपट पाहिल्यानंतर समजणार आहे.

सेव्हन स्क्रीन स्टुडिओने कोब्राच्या टीझरबाबत एक टि्वट केले आहे. अजय ज्ञानमुथू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबर तमिळ, तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. टीझरमध्ये इरफानच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळत असून हा टीझर 1 मिनिट 47 सेकंदाचा आहे. चित्रपटात अभिनेता विक्रमची भूमिका एका गणितज्ज्ञाची आहे. तर इरफानची भूमिका एका इंटरपोल ऑफिसरची आहे. ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील ’थम्पी थुल्ल' हे गाणे यापूर्वी रिलीज झाले होते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग
विजयदुर्ग हा शिवकालीन अभेद्य किल्ला आहे. याची साक्ष पटवणार्‍या अनेक खुणा आजही इथे ...

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर
सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर, विचारता मी उत्तरलो... `स्कूटी 'वालीने दिली ...

जॉन दुहेरी भूमिकेत

जॉन दुहेरी भूमिकेत
‘सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता ...

तुम्ही एकटेच आहात का?

तुम्ही एकटेच आहात का?
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर ...

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण ...