मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (16:43 IST)

सोनमने सुरू केले ब्लाइंडचे शूटिंग

Sonam
अभिनेत्री सोनम कपूर-आहुजा लवकरच आपल्या अॅतक्शन थ्रीलर ब्लाइंड चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे. शोम मखीजा दिग्दर्शित या चित्रपटात विन पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर ब्लाइंडच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकार्यातची कथा दाखविण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. 
 
या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनमचा हा चित्रपट प्रसिद्ध कोरियन ब्लाइंडचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा तमिळ रिमेकदेखील तयार करण्यात आला होता. ज्याचे नाव नेत्रीकन असे होते. या चित्रपटात दक्षिण अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत झळकली होती. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सोनम कपूरने द जोया फॅक्टर चित्रपटात दलकीर सलमानसह काम केले होते.