शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (22:13 IST)

'दृश्यम २' चे टीझर ट्विटरवर प्रदर्शित

दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या 'दृश्यम २' चित्रपटाच्या टीझर ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाचा टीझर २० सेकेंदांचा आहे. 
 
एंटनी पेरुमबवूर हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची

जबाबदारी असणार आहे. मोहनलाल यांनी चित्रपटाचा टीझर  ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'दृश्यम २' चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. महत्वाचं म्हणजे सरकारकडून परवानगी मिळताच चित्रपटाची शुटिंग सुरू करण्यात येणार आहे.