शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2020 (21:18 IST)

नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटिस

Nawazuddin Siddiqui wife demanding divorce
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने घटस्फोटाची नोटिस पाठवून उदरनिर्वाह भत्ता आणि घटस्फोट मागितला आहे. यासंदर्भात आलियाचे वकील अभय सहाय यांनी सांगितले की, कोरोना विषाणू महामारीच्या दरम्यान स्पीड पोस्ट सुविधा उपलब्ध न झाल्याने नवाजुद्दीनला ही नोटिस ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ७ मेला पाठवण्यात आली आहे. यावर अद्याप नवाजुद्दीनकडून उत्तर आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
वकील सहाय यांनी फोनवर एका वृत्तसंस्थेला सांगितलं की, 'आलियाने व्हॉट्सअॲपच्या माध्यमातून नोटिस पाठवली आहे. परंतु, नवाजुद्दीनकडून आतापर्यंत कोणतेही उत्तर मिळालेले नाही. नोटिसमध्ये उदरनिर्वाह भत्ता आणि घटस्फोट मागितला आहे.' सहाय म्हणाले की, ते घटस्फोटाच्या नोटिसवर फार काही सांगू शकत नाही. परंतु, नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप आहेत. नवाजुद्दीन आणि आलियाचे लग्न २००९ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. याआधी नवाजुद्दीनचे लग्न शीबाशी झाले होते. परंतु, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.