गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (14:22 IST)

सलमानने रिक्रिएट केला किसिंग सीन, ‘मैने प्यार किया’ आता प्रदर्शित झाला असता तर...

लॉकडाउनमुळे सर्व आपआपल्या घरात आहे आणि काही तर वेगळं करुन आपला वेळ घालवत आहे. अभिनेता सलमान खान देखील त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. आणि सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात देखील आहे. त्याने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत सलमानने ‘मैने प्यार किया’ चित्रपट या काळात प्रदर्शित झाला असता तर असे लिहित मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने या चित्रपटातील किसिंग सीनला एक रिक्रिएट केलं आहे.
 
सलमान खान आणि भाग्यश्री यांची मुख्य भूमिका असलेला ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील आरशावरील लिपस्टिक सीन सलमानने रिक्रिएट केला आहे. त्याने लिहिले की जर तो चित्रपट आता प्रदर्शित झाला असता तर लिपस्टिक मार्कचा सीन कसा झाला असता.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

यात मूळ सीन दाखवण्यात आला असून दुसर्या पार्टमध्ये सलमानने आता शूट केलेला सीन येतो. या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक बॉलीवूड कलाकरांनी देखील कमेंट्स केले आहे.