शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (12:04 IST)

‘Go Corona… Go Corona’ वरुन आठवले ट्रोल, संतापून म्हणाले ‘Come Corona‘ म्हणू का?

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात रामदास आठवले चक्क करोना विषाणूला भारतामधून परत जाण्यासाठी ‘Go Corona… Go Corona...’ अशी घोषणाबाजी करताना दिसत आहे. यावरुन आठवलेंना अनेकांनी ट्रोल केलं आहे. 
 
मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी काही चीनी नागरिक बॅनर घेऊन उभे होते. या दरम्यान त्यांची भेट घेऊन आठवले यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असं म्हटलं आणि ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून तेथे उपस्थित परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. अनेकांनी यावरुन आठवलेंना ट्रोल केलं. मात्र ट्रोल करणाऱ्यांना आता आठवलेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
 
यासंदर्भात आठवलेंनी ट्रोलर्सचा समाचार घेतला आणि सवाल केला की “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?” आठवले यांनी म्हटले की कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं.