मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (11:08 IST)

औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपाईचा विरोध

ramdas athawale
औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे.  कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र राज्य शासनाने जर ठरवले, तर नावात बदल केला जाऊ शकतो, असं रामदास आठवले म्हणाले. त्यामुळे भाजप आणि रिपाइं निवडणुकांना एकत्र सामोरे जात असतानाच मित्रपक्षांमध्ये मतांतरं दिसत आहेत.
 
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंला 5-6 जागा हव्या आहेत. इथेही महायुतीचाच महापौर असेल. औरंगाबाद महापालिकेची निवडणूकही आम्ही सन्मानाने लढणार असून इथेही महायुतीची सत्ता असेल असं आठवले म्हणाले.
 
ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असा टोमणाही रामदास आठवले यांनी लगावला.