रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (14:14 IST)

भारतामध्ये Apple Store सुरू होणार

दिग्गज टेक कंपनी Apple भारतात आपले पहिले रीटेल स्टोअर अर्थात Apple Store सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात Apple चे प्रोडक्ट्स कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये किंवा ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खरेदी करावे लागतात. 
 
पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये कंपनी भारतात पहिलं रिटेल स्टोअर सुरू करेल, अशी माहिती Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)टीम कूक यांनी दिली. तसेच, या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी आपले ऑनलाइन स्टोअरही सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनी भारतातील कोणत्या शहरात रिटेल स्टोअर सुरू करणार याबाबत स्पष्टता नाहीये, पण मुंबईत कंपनीने एक जागा निश्चित केल्याचं वृत्त आहे. कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या समभागधारकांच्या वार्षिक बैठकीत टिम कूक यांनी भारतातील योजनांबाबत माहिती दिली. “आम्ही रिटेल क्षेत्रात चांगले भागीदार बनू शकत नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने गोष्टी करायला आवडतात”, असं म्हणत कूक यांनी रिटेल स्टोअरसाठी कोणाशीही भागीदारी करणार नसल्याचे सूचित केले.