मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:18 IST)

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट ने 'अशी' केली सरकारला मदत

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांचे सहकार्य करणार आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
उद्धव ठाकरे सरकारने राज्यात केवळ दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरीबांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या योजनेचा लाभ श्रीमंत लोकही घेऊ शकतात. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने या योजनेचा समावेश केला होता.