'म्हणून' नितीन नांदगावकर यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला होता. या प्रकरणी नितीन नांदगावकर यांच्यावर अॅन्टोप हील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माटुंगा रेल्वे स्थानक इथे छेडछाड करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला होता, मात्र समोर येऊन कुणीही तक्रार न केल्याने आरोपीला सोडून देण्यात आले होते. मात्र हे आरोपी मोकाट राहिले आणि यांना धडा शिकवला नाही, तर हे असेच कृत्य करतील. यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर हे पंधरा दिवसापासून शोध घेत होते.
नांदगावकर यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. चोप दिलेला व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता.