रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (09:23 IST)

पोलीस अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई गुन्हे शाखेचा समन्स

भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई गुन्हे शाखेने समन्स पाठवलं आहे. 2018 मध्ये पायधुनी पोलीस ठाण्यातील खंडणी आणि आर्म एक्ट प्रकरणात तारिक प्रवीण आणि सलीम महाराज यांना अटक न करता हे प्रकरण मिटवल्याचा पडवळ यांच्यावर आरोप आहे.

एजाज लकडावलाच्या अटकेनंतर तारिक प्रवीण आणि सलीम महाराज या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यानंतर आता मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावेसुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. प्रवीण पडवळ मुंबई क्राईम ब्राँचचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्यासमोर हजर राहतील. प्रवीण पडवळ सध्या मुंबई वाहतूक पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. क्राईम ब्रांचच्या म्हणण्यानुसार प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या उत्तरानुसार पोलीस दल आणि अंडरवर्ल्डशी संबंधित धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.