सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (16:52 IST)

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....

health tips benifits of naturopathy
निसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता औषधोपचार करणे. आजच्या काळात तीव्र आणि मोठ्या आजारांच्या उपचारासाठी फारच प्रचलित आहे. निसर्गोपचाराचे वर्णन आपल्या वेदशास्त्रांमध्ये केले गेले आहे. यामध्ये शरीरातील जुने लपलेले आजारही बाहेर येतात. ही उपचार पद्धती शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारांसाठी पण उपयोगी आहे. या मध्ये कुठलेही औषध न वापरता पाच घटक वापरले जातात.
 
निसर्गोपचार म्हणजे निसर्गाच्या मदतीने केला जाणारा उपचार. या उपचार पद्धतीमध्ये औषधांचा वापर न करून नैसर्गिक 5 घटक-पृथ्वी (माती), अग्नी, आकाश, जल, वायू यांचा वापर करून रुग्णाला रोगाविरुद्ध लढा करण्यासाठी सक्षम करते. या घटकातील मातीचा वापर शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी वापरले जाते, पाण्याचा वापर हायड्रोथेरपी म्हणून केले जाते. यामुळे पोटाच्या त्रास आणि लघवीची समस्या दूर होते. या मध्ये होमिओपॅथी, एक्यूपंचर, हर्बल औषध तसेच बायो-रेझोनांस, ओझोन थेरेपी आणि कोलन हायड्रोथेरेपी सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. 
 
चला मग आपण जाणून घेऊ या कुठल्या आजारांसाठी याचा वापर होऊ शकतो..
 
डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घरीच या उपचाराच्या साहाय्याने सांधेदुखी, ऑर्थरायटीस, स्पॉन्डिलाइटिस, सिस्टिका, मायग्रेन, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन रोग, दमा, ब्राँकायटिस, मूळव्याध (पाईल्स), बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी, पेप्टिक अल्सर, फॅटी यकृत, कोलायटिस, सीओपीडी (क्रॉनिक, ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि त्वचा संबंधित रोगांचा यशस्वीरीत्या उपचार केला जाऊ शकतो. पण त्यापूर्वी ह्याची संपूर्ण माहिती असणे देखील आवश्यक आहे. 
 
आज भारतसरकार देखील निसर्गोपचाराची पद्धत वापरण्याचा सल्ला आणि आग्रह धरत आहे यासाठी आयुष्य मंत्रालयाने देशव्यापी निसर्गोपचार केंद्रे सुरू केले आहे.
निसर्गोपचारांची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत
 
निसर्गोपचारात रूग्णांच्या गंभीर आजारांवर उपचार त्वरित केला जातो.
ह्या उपचारात दडलेले रोग बाहेर काढून त्यावर उपचार करून कायमचे बरे केले जातात.  
निसर्गोपचार एकाच वेळी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्व गोष्टींचा उपचार करतो.
 
निसर्गोपचारांचे फायदे
रोगांशी लढण्याची क्षमता प्रदान करतो.
विकारांना दूर करते.
अनिद्रा मध्ये त्वरित आराम देते.