भीमरूपी स्तोत्र

Last Modified बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (11:55 IST)
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी । सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू । चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे । मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं । मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे । तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली । दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू । रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥
॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥१॥


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे फायदे

कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे फायदे
कार्तिक महिन्याला शास्त्रात पुण्य महिना असे ही म्हणतात. पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात ...

भुलाबाई गाणी : मग जा आनंदात माहेरा माहेरा !!

भुलाबाई गाणी : मग जा आनंदात माहेरा माहेरा !!
सकाळी लवकर उठ ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा, सकाळी उठून योगा कर ग सुनबाई, नकोच जाऊ ...

एक अखंड दिवा लावून आपण कोट्याधीश होऊ शकता

एक अखंड दिवा लावून आपण कोट्याधीश होऊ शकता
ईशान्य कोपर्‍यात गुलाबी कमळावर विराजमान लक्ष्मीची पूजा करावी आणि पूजेसाठी दोन ‍दिवे ...

घर सजवताना हे रंग वापरा, सुंदरतेसह शांती अनुभवाल

घर सजवताना हे रंग वापरा, सुंदरतेसह शांती अनुभवाल
सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. दिवाळी काहीच दिवसांवर येऊन टिपली आहे. त्या पूर्वी ...

कोजागरी पौर्णिमा माहिती, महत्त्व आणि पूजा विधी

कोजागरी पौर्णिमा माहिती, महत्त्व आणि पूजा विधी
अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. ...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...