मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (17:05 IST)

लश्कर-ए-तैय्यबाच्या नावाने ई-मेल, हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील एक सेव्हन स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांचे जॉइंट कमिश्नर (क्राईम) यांच्या  माहितीनुसार, दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैय्यबाच्या नावाने ई-मेल पाठवून धमकी दिली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 
 
या ई-मेलमध्ये मुंबईतील चार हॉटेल्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये म्हटले आहे की, जर २४ तासांच्या आत सव्वा सात कोटी रुपये देण्यात आले नाहीत तर हॉटेल्स बॉम्बने उडवण्यात येतील. ही रक्कम बिटक्वाईनमध्ये मागण्यात आली आहे. 
 
या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी सर्व हॉटेल्सची तपासणी केली. परंतु, तेथे काही आढळून आले नाही. हॉटेल्समध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हा ई-मेल कुठून आला आहे, याचा तपास पोलिस करत आहे. मुंबईतील लीला, रामदा, पार्क आणि सी प्रिन्स ही चार हॉटेल्स आहेत.