1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 (15:09 IST)

मुंबईत समुद्रात गुजरातमधील मच्छीमाराचा बुडून मृत्यू

death
मुंबईमध्ये समुद्रात गुजरातमधील एका मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री मोरा जेट्टीजवळ हा अपघात घडला. मुसळधार पावसामुळे तो जेट्टीवर अडकला होता आणि यादरम्यान तो बोटीतून घसरून समुद्रात पडला असे सांगण्यात येत आहे. सुमारे २४ तासांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मृताचे नाव भरत नरसी दलकी असे आहे, जो गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वेरावळ बंदराचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ ऑगस्टच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच मोरा कोस्टल पोलिस सक्रिय झाले.व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली.