1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (08:45 IST)

Mumbai Fire: दादर येथील कपड्याच्या दुकानाला आग

clothing shop
मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) भागात असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आगलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र धुराचे लोळ परसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसंच या आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
 
दादर हे अत्यंत मोक्याचे असून येथे दुकानांची रांगच रांग आहे. तसंच या भागात लोकांची चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे हानी होण्याची शक्यता अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.