मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली – हेमंत टकले

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गरीबांना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शिवथाळी योजना राबवण्य़ाचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून राज्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यावर भाजपाचे आमदार राम कदम यांनी ही घोषणा खोटी असल्याचे मत मांडले. त्यामुळे शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी विरोधकांना लगावला. 
 
थाळीसंदर्भातील स्वतःचा अनुभवही हेमंत टकले यांनी विशद केला. महालक्ष्मी रेसकोर्स येथे जेवणाच्या वेळेत तिथल्या कँटीनमध्ये थाळीचा आस्वाद हेमंत टकले यांनी घेतला. साठ रूपयात मिळालेल्या थाळीत उत्तम जेवण मिळाले. अशाच प्रकारचे उत्तम जेवण केवळ दहा रुपयात सरकारच्या शिवभोजन मोहीमेतून गरीबांना मिळणार आहे. यामुळे विरोधकांचे पोट दुखेलच.. पण त्यावर देखील मार्ग काढण्यात येईल, असे सांगत हेमंत टकले यांनी विरोधकांवर खोचक टीका केली.