शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (20:38 IST)

शकुंतला देवी डिजीटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

अभिनेत्री विद्या बालन यांचा गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक शकुंतला देवी हा चित्रपटदेखील आता डिजीटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इन यावर प्रदर्शित होणार असून त्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तर विद्या बालन यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र  अद्याप याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही. 
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. तर विक्रम मल्होत्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून ओळखले जाते. लहानपणापासून त्यांना गणित विषयाची आवड होती. त्या एक महान गणितज्ज्ञ होत्या. १९८२ मध्ये त्यांच्या नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली.