गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (14:57 IST)

अमेझॅन प्राइम व्हिडियोवर शाहरुख खानचा टीव्ही शो 'फौजी' उपलब्ध

shahrukh khan
बॉलीवूड किंग शाहरुख खानने 1989 मध्ये टीव्ही मालिका 'फौजी' ने आपल्या अभिनय करिअरची सुरूवात केली होती. 'फौजी' च्या कॅप्टन अभिमन्यू रॉयला लोकं अजूनही विसरले नाहीत. फक्त 13 एपिसोड असलेली ही मालिका अत्यंत प्रसिद्ध् झाली होती. आता ती ऑनलाइन उपलब्ध आहे. आता आपण हा टीव्ही शो अमेझॅन प्राइमवर पाहू शकता.
 
या मालिकेत शाहरुख खानने कॅप्टन अभिमन्यू रॉयची भूमिका बजावली होती. विश्वजित प्रधान आणि विक्रम चोप्रासारखे स्टार्स देखील याचे भाग होते. याचे प्रसारण दूरदर्शनवर होत होतं. कर्नल राज कपूर यांनी हे दिग्दर्शित केले होते. 
 
'फौजी' नंतर शाहरुख खान अनेक मालिकेत दिसला, जसे - सर्कस (1989-90), दूसरा केवल (1989), इडियट (1991). त्यानंतर तो दिल्लीहून मुंबई आला. मग 1992 मध्ये ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांच्या चित्रपट 'दीवाना' मधून त्याने बॉलीवूड डेब्यू केलं आणि बॉलीवूड जगात धमाल केली आणि आज किंग खान म्हणून ओळखला जातो. बॉलीवूडचा 'किंग' बनून शाहरुखने प्रेक्षकांचे मन जिंकले.