मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 20 मे 2020 (10:56 IST)

बोनी कपूर यांच्या घरात एकाला करोनाची लागण, जान्हवी-खुशी क्वारंटाइन

Boney kapoor
बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात एक करोना रुग्ण सापडला आहे. त्यांच्या येथे काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बोनी यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली. यामुळे आता बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खूशी कपूरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे.
 
बोनी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की आमच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तो शनिवारी संध्याकाळपासून आजारी होता. त्यामुळे आम्ही त्याला करोना चाचणी करण्यासाठी पाठवले आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले. त्याची माहिती सोसायटीमध्ये दिली. त्यांनी मी, माझी मुले आणि माझ्या घरात काम करणारे इतर कर्मचारी ठिक असल्याचे सांगितले. 
 
बोनी यांनी सांगितले की आम्ही सगळ्यांनी पुढचे १४ दिवस स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.