शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मे 2020 (12:35 IST)

लॉकडाऊनच्या काळात या सोप्या पद्धतीने स्वच्छ ठेवा आपल्या घरातील वस्तू

1 चॉपिंग बोर्ड -  आपल्याकडे चॉपिंग बोर्ड लाकडी असल्यास त्यामध्ये भेगा पडतातच आणि त्या भेगांमध्ये घाण साचून राहणे अगदी साहजिक आहे. या बोर्डाला स्वच्छ करण्यासाठी त्यावर थोडं मीठ भुरभुरून देऊन त्याला अर्ध्या लिंबाच्या फोडीने स्वच्छ करून तसेच पडू द्यावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. चॉपिंग बोर्ड एकदम स्वच्छ होईल.
 
2 काचेच्या प्लेट्स - काचेच्या प्लेट्सवर स्क्रॅच दिसत असल्यास प्लेट्स वर खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा) आणि पाणी घालून त्याची पेस्ट बनवून प्लेट्स वर लावून देणे. काही वेळे नंतर धुऊन घेणे, स्क्रॅच नाहीसे होतात.
 
3 स्पॉन्ज वापरत असल्यास - काही लोकांची सवय असते की ते घरातील प्रत्येक जागेच्या स्वच्छतेसाठी वेग वेगळे स्पॉन्ज वापरतात. असे केल्याने त्या स्पॉन्जांमध्ये असंख्य जिवाणू साठतात. या स्पॉन्जांची स्वच्छता करण्यासाठी ह्यांना मायक्रोवेव्ह मध्ये 90 सेकंदासाठी ठेवून द्या जिवाणूंचा 99 टक्के नायनाट होतो. तसेच स्पॉन्ज स्वच्छ होतं.
 
4 काचेचे ग्लास- या ग्लासात पाण्याचे डाग पडतातच. काही लोकं असे झाल्यावर चक्क काचेचे ग्लास टाकून देतात. ते वापरण्यात सुद्धा घेत नाही. असे करू नका. पाण्याचे डाग घालविण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरमध्ये सम प्रमाणात पाणी घालून काचेच्या ग्लासांवर लावून 15 मिनिटासाठी तसेच ठेवा. काचेच्या ग्लासावरील पाण्याचे डाग जातील. 
 
5 शॉवर हेड्स - शॉवर हेड्सच्या चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की या मध्ये एक असे जिवाणू घर करतात जे आपल्याला श्वास घेण्यासाठी अडथळे निर्माण करतात. या रोगाचा नायनाट करण्यासाठी शॉवर हेडला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. शॉवर हेड ला स्वच्छ करण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरला चांगल्या प्रकारे चोळून एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रात्र भर लावून ठेवा. सकाळी शॉवर स्वच्छ होईल.