सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (17:41 IST)

हा काळ म्हणजे स्वतःला शोधण्याचा काळ

सध्या लॉकडाऊनचा काळ आहे. लॉकडाऊन संपलं तरी क्वारंटाईन काळ हा राहणारच. सध्याचा काळ काहीही काम होत नसून हा वेळ वायफळ जात असल्याचं कित्येकाच्या मनात येत आहे परंतू हा आपला गैर समज आहे. 
 
आपल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी, आपल्या करियरमध्ये बदल करण्यासाठी, काही नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असल्यास या वेळेच्या उपभोग घ्यावा. ही वेळ न गमावता तयारीला लागा. चला मग काही कामाच्या टिप्स जाणून घेऊया.
 
आपल्या रेझ्युमे अपडेट करा-
एक चांगला रेझ्युमे आपल्या करियरसाठी आणि आपल्या नोकरीसाठी खूप महत्त्वाचा असतो. वेळोवेळी त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. अश्या वेळी जेव्हा आपल्या कडे वेळच वेळ आहे त्वरित हे काम करावे. रेझ्युमे लिहिण्याचा पद्धती मध्ये काही बदल आले असतील तर त्याचा विचार केला पाहिजे.
 
आपली कौशल्ये वाढवा- 
नोकरी आणि घर यामुळे काही वेळा काही गोष्टी दडपून जातात. काही वेळा आपल्याला काही शिकावेसे वाटत असते पण वेळेअभावी आपल्याला शिकता आले नसल्यास सध्याचा लॉक डाऊनच्या काळात आपण या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन नव्या नव्या गोष्टी शिकाव्यात जसे की लिखाणाची कला किंवा आपल्याला आवडणारी कुठली ही गोष्ट. 
 
जेवण्याची पद्धत- 
कामाच्या व्यापात मित्रांसमवेत बाहेर जाऊन खाणं पिणं करणं हे साहजिकच आहे. अश्या वेळी जेवण्याची पद्धत माहीत नसल्याने लाजिरवाणं व्हावेसे लागते. आता या लॉक डाऊनच्या काळामध्ये या वेळेचा चांगला वापर करावा आणि जेवण्याचा पद्धतीकडे लक्ष द्या. 
 
नृत्य- 
आपल्याला नृत्याची आवड असल्यास आपण नृत्य करून सुद्धा आपल्या स्वतःला आनंदित ठेवू शकता. नृत्य आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतं.