शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (16:56 IST)

बिनधास्त जगा मित्रांनो कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा..

●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)
 
●पन्नाशी नंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )
 
●साठी नंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)
 
●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)
 
●ऐंशी नंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )
 
●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)
 
अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?
जीवन साधे-सरळ-सोपे आहे. आनंदाने जगा...! 
उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणि भाव आणू नका.
एक लक्षात ठेवा...! 
लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा. 
स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण...... 
 
- सोशल मीडिया