जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील : १) ब्रम्हमुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी...