शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (09:42 IST)

कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्या दिनचर्येत आणि आहारात असा बदल करा

कोरोनापासून मुक्त होण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरल्या जात आहे, पण कोरोनाबद्दलची भीती इतकी आहे की वातावरणात बदल झाल्यावर होणाऱ्या सर्दी पडस्याला देखील लोक कोरोनाने जोडून बघत आहे, कारण कोरोना व्हायरसची लक्षणे देखील सर्दी, नाक वाहणे, पडसे आणि ताप आहे. अशा परिस्थितीत, अस्वस्थ न होता किंवा घाबरून न जाता काही गोष्टी आपल्या जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे जेणे करून या व्हायरसवर विजय मिळवू शकू आणि ती देखील कोणतीही भीती न बाळगता. चला तर मग जाणून घेऊ या कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन नियमावली मध्ये कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या आहारात कोणती काळजी घ्यावयाची आहे.
 
* कोरोना टाळण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, वैयक्तिक स्वच्छता राखणं म्हणून आपल्या हातांना स्वच्छ ठेवायला विसरू नये. हाताला धुणं कोरोनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी सर्वात अचूक मार्ग आहे. या साठी आपण हाताला वेळो-वेळी सेनेटाईझ करतं राहावं . घराच्या बाहेर असताना सेनेटाईझर वापरावं. घरात असाल तर आपले हात साबणाने स्वच्छ करावे.
* घरातून बाहेर पडताना मास्क वापरावे.जेव्हा देखील आपण बाहेर पडाल किंवा एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क आवर्जून वापरावे.
* बहुतेक लोकांना आपल्या डोळ्यांना वारंवार चोळण्याची, चेहऱ्यावर हात लावण्याची सवय असते. आपल्याला स्वतःला कोरोनाच्या व्हायरसला टाळण्यासाठी चेहऱ्याला हात लावण्यापासून रोखले पाहिजे. जर आपण आपल्या चेहऱ्याला हात लावता तर कळत-नकळत व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. 
* दुसऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी करणे टाळा. 'नमस्ते' किंवा नमस्कार करणे कोरोनाच्या काळात चांगले आहे. हात मिळवणी करून हा व्हायरस सहजपणे एका व्यक्ती पासून दुसऱ्याकडे पोहोचू शकतो.
* मॉल किंवा वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नका, कारण या मधून कोणाला विषाणूची लागण लागलेली आहे हे सांगता येणं कठीण आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर देखील सल्ला देत आहे की कोरोना व्हायरस टाळण्यासाठी या काळात मॉल्स मध्ये जाऊ नये.
* आपल्या मोबाईल आणि लॅपटॉप वेळोवेळी स्वच्छ आणि सेनेटाईझ करावं जेणे करून ते व्हायरसच्या संपर्कात येऊ नये.
* बाहेरून घरी आल्यावर घरातील इतर सदस्यांशी संपर्क साधण्यापूर्वी अंघोळ करा आणि आपले कपडे बदलून स्वच्छ कपडे घाला, मगच आपल्या कुटुंबाच्या इतर सदस्यांशी संपर्क करा.
* आपण सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना सावधगिरी बाळगा आणि मास्कचा वापर आवर्जून करावा. ग्लव्ज देखील वापरायला विसरू नका.
* चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात पौष्टिक आहार समाविष्ट करणे. फळ-भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करावे. मैद्याचे खाद्य पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करू नये. सालीचे धान्य आपल्या आहारात घ्यावे. अंकुरलेले कडधान्य आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिने समृद्ध असलेले अन्न आहारात समाविष्ट करा.
* आपल्या दिनचर्येमध्ये योगाला समाविष्ट करा. जेणे करून आपण आपली प्रतिकारक शक्ती बळकट करू शकाल.
* आपल्या आहारात आलं आणि लसूण समाविष्ट करावं. सकाळी अनोश्यापोटी आपण लसणाच्या एका पाकळीचे सेवन करू शकता.
* हर्बल टी चे सेवन नियमितपणे करावे जेणे करून आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट होईल.
* रात्री झोपण्याच्या पूर्वी हळदीचं दूध प्यावं. हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट ठेवण्यात खूप उपयुक्त असत.
 
जेवणात या गोष्टींची काळजी घ्या-
* जास्त प्रमाणात मीठ घेणं टाळा.
* जास्त गोड खाऊ नका.
* मैद्याचे खाद्य पदार्थ खाऊ नका.
* भाज्यांना गरम पाण्याने धुऊन घ्या मगच चांगल्या प्रकारे शिजवून खावं.