सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (10:18 IST)

चांगल्या आरोग्यासाठी या 10 गोष्टींची काळजी घ्या

आपल्या शास्त्रांमध्ये आरोग्यास सर्वात मोठी संपत्ती मानले आहेत. जर पेश्यांचे नुकसान झाले तर ते आपण पुन्हा कमावू शकतो. पण एकदा आपले आरोग्य खराब झाल्यावर त्याला नियंत्रणात आणणे कठीण आहे म्हणून आपल्याला आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. चांगले आरोग्य मिळविण्यासाठी काही निवडक गोष्टी जाणून घेऊ या.
 
* गव्हाचं पीठ चाळू नका.
 
* मिठाचा वापर कमीत कमी करा.
 
* दुपारच्या आणि रात्रीच्या जेवण्यापूर्वी सॅलड खावे.
 
* दिवस भरातून सर्वात कमी जेवण रात्रीचा वेळी करावं. 
 
* अन्नाला गिळू नका चावून चावून खावं.
 
* अती जास्त आणि फार कमी जेवू नये.
 
* भाज्यांना सोलू नका हळुवार स्क्रब करा.
 
* जेवण्यात पिवळ्या, केशरी आणि हिरव्या भाज्या आवर्जून वापरा.
 
* फास्ट फूड आणि पॅक्ड फूड हृदयासाठी हानिकारक आहे.
 
* वाढत्या वयामुळे जेवण देखील कमी करावं.