शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (09:51 IST)

ड्राय फ्रुट्ससह कॉम्बिनेशन, याचे फायदे वाचून हैराण व्हाल

ड्राय फ्रुट्स किंवा सुका मेवा हे घेणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हे आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करत. त्याच सह हे आपल्या शरीरातील पोषक तत्वांचा आणि शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेची पूर्णता करण्याचं काम देखील करतं. आपण कधी सकाळच्या आहारात सुक्या मेवा सामील करण्याचा विचार केला आहे का? 
 
जर नाही, तर मग आजच याचा विचार करा. याचे कारण असे की हे वेग वेगळे ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरात वेग वेगळ्या भूमिका बजावतात. काही खास ड्रायफ्रूट्स कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात, चला तर मग आज आपण अश्याच काही ड्रायफ्रूट्स च्या आरोग्यदायी कॉम्बिनेशन बद्दल जाणून घेऊया.  
 
पिस्ता आणि खजूर -
पिस्ता आणि खजूर बहुतेक हे सर्वाना आवडतातच, पण काही लोकं याला आवश्यक म्हणून खात नाही. पिस्ता आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीला नियंत्रित करतं तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर हे हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. आणि मज्जासंस्था निरोगी ठेवते. तसेच ज्या लोकांना रातांधळेपणाचा त्रास होतो त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. त्याशिवाय हे अश्या बायकांसाठी देखील फायदेशीर आहे ज्यांना अशक्तपणाचा त्रास आहे आणि त्यासाठी औषधोपचार घेत आहे. अश्या प्रकारे हे दोन्ही सुकेमेवे एकत्ररित्या घेतल्यानं या सर्व त्रासांपासून बचाव होऊ शकतो.
 
पिस्ता आणि खजूर कसे वापरावे ?
* आपल्या सकाळच्या स्मूदी मध्ये 3 -4 पिस्ते आणि खजूर टाकून आपण याचे सेवन करू शकता.  
* आपण हे सांज्यात मिसळून खाऊ शकता.
* आपण हे कच्च्या रूपात देखील खाऊ शकता आणि सॅलडच्या रूपात देखील घेऊ शकता.
 
अंजीर आणि जर्दाळू -
या बद्दल बोलायचे म्हटलं, तर हे पोट आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. हे आपल्या त्वचेला पेशींच्या नुकसानापासून वाचवत आणि सुरकुत्यांना कमी करतं. ताजे जर्दाळू कमी कॅलरीच्या स्नेक्सचे आरोग्यदायी विकल्प आहेत आणि व्हिटॅमिन बी 6 ने समृद्ध असतात. हे चयापचय वाढविण्यास आणि रक्त पेशी, संयोजी ऊतक आणि न्यूरोट्रान्समीटर निर्मिती सह अनेक शारीरिक प्रक्रियांस मदत करतात. त्याच वेळी, अंजीर दृष्टीस सुधारते आणि रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. हे आपल्या हाडांना आणि हिरड्यांना निरोगी ठेवते. 
 
अंजीर आणि जर्दाळू कसे वापरावे ?
* आपण अंजीर आणि जर्दाळू एकत्ररित्या ओट्स मध्ये मिसळून खाऊ शकता.
* आपण याची फ्रूट चाट म्हणून देखील बनवून खाऊ शकता.
 
बदाम आणि बेदाणे (किशमिश) -
बेदाणे बद्धकोष्ठता दूर करते आणि हे दोन्ही आपल्या पचनसंस्थेला व्यवस्थित राखण्यासाठी फायदेशीर असतं. हे उच्चरक्तदाब कमी करतं आणि आपल्या दातांना आणि हाडांना निरोगी ठेवतं. रात्रीच्या वेळी हे दोन्ही भिजत टाकून खाल्ल्यानं हे मेंदूच्या ऊर्जेला वाढवते. त्याच बरोबर हे दृष्टीस सुधारते.

बदाम आणि बेदाणे कसे वापरावे?
* आपण बदाम आणि बेदाणे सांज्यात मिसळून खाऊ शकता.
* सकाळच्या सॅलडमध्ये देखील आपण घेऊ शकता.
* आपणास त्वरित ऊर्जा पाहिजे असल्यास याना कच्च खावं.
 
अश्या प्रकारे आपण या तिन्ही सुक्यामेवाचे कॉम्बिनेशनकरून सेवन केल्यानं शरीरास बरेच फायदे देऊ शकतं. मग ह्याला आपल्या आहाराचा एक भाग जरूर बनवा आणि काही खास पाककृतींसह याचे सेवन करा.