संबंधित माहिती
- Women's Day घरगुती सेलिब्रेशनसाठी काही आकर्षक 'डेजर्ट' रेसिपीज
- International Women’s Day 2026 Theme आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजीच का साजरा केला जातो?
- Women's Day Special Dinner Recipes हे पदार्थ बनवायला सोपे आणि दिसायला 'रॉयल'
- Vegetable Upma Recipe सकाळी नाश्त्यासाठी उत्तम आरोग्यदायी रेसिपी
- Masale Bhat अस्सल महाराष्ट्रीयन 'मसाले भात' रेसिपी
महिला दिनानिमित्त घरातील स्त्रियांना विश्रांती देत बनवा 'रॉयल' आणि 'झटपट' होणार खास मेनू
जागतिक महिला दिनानिमित्त घरातील स्त्रियांना विश्रांती देण्यासाठी किंवा त्यांच्या सन्मानार्थ खास बेत आखायचा असेल, तर दुपारच्या जेवणासाठी 'रॉयल' आणि 'झटपट' होणारे मेनू नक्की ट्राय करा. याकरिता आज आपण पाहणार आहोत खास रेसिपी जी अगदी सहज बनवता येईल. पनीर लवाबदारसोबत 'बटर पराठा' म्हणजे एक उत्तम मेजवानी, तुम्ही घरच्या घरी अगदी हॉटेलसारख्या चवीचे पनीर बनवू शकता.
पनीर: २५० ग्रॅम (चौकोनी तुकडे केलेले) आणि ५० ग्रॅम (किसलेले/Grated)
कांदा: २ मध्यम (बारीक चिरलेले)
टोमॅटो: ३ मोठे (प्युरी केलेले)
काजू: १०-१२ (भिजवलेले)
आलं-लसूण पेस्ट: १ मोठा चमचा
मसाले: १ चमचा काश्मिरी लाल तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा धने पूड, १/२ चमचा गरम मसाला.
खडा मसाला: १ तमालपत्र, २ लवंगा, १ मोठी वेलची, १ दालचिनीचा तुकडा.
२ चमचे बटर, २ चमचे तेल, २ चमचे ताजी साय (Cream), १ चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ.
कृती-
ग्रेव्हीचा पाया तयार करणे-मिक्सरमध्ये भिजवलेले काजू आणि थोडे पाणी घालून त्याची एकदम मऊ पेस्ट करून घ्या. दुसऱ्या बाजूला टोमॅटोची देखील प्युरी करून ठेवा.
मसाला परतणे-कढईत तेल आणि बटर गरम करा. त्यात जिरे आणि सर्व खडे मसाले टाका. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
टोमॅटो आणि काजू पेस्ट-आता त्यात टोमॅटो प्युरी घाला. प्युरीला तेल सुटेपर्यंत चांगले शिजू द्या. तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, धने पूड आणि मीठ घाला. यानंतर तयार केलेली काजूची पेस्ट घाला आणि १-२ मिनिटे नीट हलवा.
लवाबदार टच- मसाल्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घाला. आता यात जे किसलेले पनीर आहे ते टाका. (किसलेल्या पनीरमुळेच ग्रेव्हीला 'लवाबदार' पोत मिळतो). व १ चमचा साय (Cream) घालून मिक्स करा.
पनीर आणि फिनिशिंग-आता पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. ५ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊ द्या. शेवटी हातावर चोळून कसुरी मेथी आणि गरम मसाला वरून टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
सर्व्हिंग टीप- सर्व्ह करताना वरून थोडे किसलेले पनीर आणि क्रीम टाकल्यास ते अगदी हॉटेलसारखे दिसते.
गव्हाचे पीठ: २ कप
मैदा: १/२ कप (ऐच्छिक, हॉटेलसारख्या टेक्सचरसाठी)
मीठ: चवीनुसार
तेल/तूप: १ मोठा चमचा (कणिक मळण्यासाठी)
बटर (लोणी): ३-४ मोठे चमचे (पराठ्याला लावण्यासाठी)
कलौंजी (काळे तीळ) किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर: सजावटीसाठी
कोमट पाणी: कणिक मळण्यासाठी
कृती-
कणिक मळणे-एका परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ आणि १ चमचा तेल एकत्र करा. थोडे थोडे कोमट पाणी घालून मध्यम मऊ कणिक मळून घ्या. (कणिक जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावी). कणकेला थोडे तेल लावून १५-२० मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून पराठे मऊ होतील.
पदर पाडणे-कणकेचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्या आणि त्याची पातळ पोळी लाटून घ्या. त्या पोळीवर सगळीकडे थोडे बटर लावा आणि वरून थोडे कोरडे पीठ भुरभुरा. आता त्याचे 'लच्छा पराठ्या'प्रमाणे पदर पाडण्यासाठी, पोळी एकावर एक घड्या घालत (Fan folding) गोळा करा किंवा मधून कापून रोल करा. हा तयार झालेला रोल गोलाकार फिरवून त्याचा पुन्हा गोळा तयार करा.
पराठा लाटणे-या गोळ्यावर थोडी कोथिंबीर किंवा कलौंजी दाबून लावा. हलक्या हाताने पराठा लाटा. जास्त जोरात लाटू नका, नाहीतर त्याचे पदर (Layers) दबले जातील.
भाजणे-तवा मध्यम आचेवर गरम करा. पराठा तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी हलका भाजून घ्या. आता त्यावर भरपूर बटर सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी ठिपके येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
टीप- पराठा तव्यावरून काढल्यानंतर तो हाताने थोडा 'क्रश' करा (दुमडा). यामुळे त्याचे पदर सुटे होतात आणि तो दिसायला व खायला अगदी हॉटेलसारखा लागतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
'पनीर लवाबदार रेसिपी'
साहित्य-पनीर: २५० ग्रॅम (चौकोनी तुकडे केलेले) आणि ५० ग्रॅम (किसलेले/Grated)
कांदा: २ मध्यम (बारीक चिरलेले)
टोमॅटो: ३ मोठे (प्युरी केलेले)
काजू: १०-१२ (भिजवलेले)
आलं-लसूण पेस्ट: १ मोठा चमचा
मसाले: १ चमचा काश्मिरी लाल तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा धने पूड, १/२ चमचा गरम मसाला.
खडा मसाला: १ तमालपत्र, २ लवंगा, १ मोठी वेलची, १ दालचिनीचा तुकडा.
२ चमचे बटर, २ चमचे तेल, २ चमचे ताजी साय (Cream), १ चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ.
कृती-
ग्रेव्हीचा पाया तयार करणे-मिक्सरमध्ये भिजवलेले काजू आणि थोडे पाणी घालून त्याची एकदम मऊ पेस्ट करून घ्या. दुसऱ्या बाजूला टोमॅटोची देखील प्युरी करून ठेवा.
मसाला परतणे-कढईत तेल आणि बटर गरम करा. त्यात जिरे आणि सर्व खडे मसाले टाका. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
लवाबदार टच- मसाल्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घाला. आता यात जे किसलेले पनीर आहे ते टाका. (किसलेल्या पनीरमुळेच ग्रेव्हीला 'लवाबदार' पोत मिळतो). व १ चमचा साय (Cream) घालून मिक्स करा.
पनीर आणि फिनिशिंग-आता पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. ५ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊ द्या. शेवटी हातावर चोळून कसुरी मेथी आणि गरम मसाला वरून टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
सर्व्हिंग टीप- सर्व्ह करताना वरून थोडे किसलेले पनीर आणि क्रीम टाकल्यास ते अगदी हॉटेलसारखे दिसते.
'बटर पराठा' रेसिपी
साहित्य-गव्हाचे पीठ: २ कप