1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (10:16 IST)

मिस्कील स्वामी विवेकानंद

Prerak Prasang of Swami Vivekananda
एका ब्रिटिशाने विवेकानंदांना विचारले, 
सगळे कपाने चहा पीत आहेत आणि तू एकटा असभ्यासारखे 
बशीतून चहा पीत आहेस, कारण काय?
विवेकानंदांचे उत्तर ऐकून सभेतील सर्वांनी माना खाली घातल्या.
ते म्हणाले "यावेळी जर कोणी नवीन माणूस येथे आला तर मी एकटाच माझा अर्ध्या चहाचा कप त्याला देऊ शकतो, कारण तुम्ही सर्वांनी तुमचे कप उष्टे केले आहेत. हि आमच्या भारतीयांची संस्कृती आहे."
 
मिस्कील स्वामी विवेकानंद..
स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाचा किस्सा आहे.
एक 'पीटर' नावाचे प्रोफेसर विवेकानंद यांचा तीव्र द्वेष करीत. एक दिवस डायनिंग रूममध्ये प्रो पीटर जेवण करीत असताना विवेकानंद हातात जेवणाचे ताट घेऊन आले आणी प्रो पीटर चे शेजारी असलेल्या खुर्ची वर बसले...यामुळे चिडून अस्वस्थ झालेले पीटर बोलले.. 
"मि. विवेकानंद, एक सुंदर पक्षी आणि एक घाणेरडे डुक्कर कधीच एकत्र बसून जेवण करीत नाहीत. "
विवेकानंद यांनी शांतपणे प्रो. पीटर कडे पाहून म्हटले "काळजी करू नका ...  प्रोफेसर मी उडून दूर जातो..!"
प्रोफेसर पीटर यांचा जळफळाट झाला. त्यांनी बदला घेण्याचा निश्चय केला.
 
दुसऱ्या दिवशी वर्गात त्यांनी विवेकानंद यांना उभे करून प्रश्न विचारला "मि. विवेकानंद, तू रस्त्याने जात असताना तुला दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या.. एका मध्ये पैसे आहेत आणि एका मध्ये शहाणपणा आहे.. तू कोणती पिशवी घेशील?"
एक क्षणाचाही विचार न करता विवेकानंद उत्तरले "अर्थातच पैसे असलेली पिशवी घेईन...
"प्रो. पीटर विवेकानंदांची टर उडवून हेटाळणीच्या सुरात बोलले "तुझ्या जागी मी असतो तर शहाणपणाची पिशवी घेतली असती.."
विवेकानंद यांनी प्रो पीटर यांना सहमती दर्शवून म्हटले "बरोबर आहे.. ज्याचे जवळ जे नाही तेच त्याने घ्यावे.."
प्रो पीटर शरमेने आणि संतापाने लाल झाले. त्यांनी विवेकानंद यांना धडा शिकविण्याचे ठरविले.
 
त्यांनी विवेकानंद यांचे उत्तरपत्रिकेवर 'इडियट' असे लिहिले.
विवेकानंद यांनी उत्तरपत्रिका घेऊन शांतपणे बसून राहिले..
प्रो. पीटर यांनी विचारले "कुणाला काही शंका..??"
विवेकानंद यांनी उत्तरपत्रिका दर्शवित सांगितले "प्रोफेसर...
तुम्ही उत्तरपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी केली आहे पण मार्क्स द्यायला विसरले आहात ..."