मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (11:10 IST)

या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!

मंदी जाणवण्याची कारणे
1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.
 
2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.
 
3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.
 
4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)
 
5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.
 
6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.
 
7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.
 
8. कर्जांचे व्याज फेडणे.
 
9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.

10. लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.
 
11. पार्टी कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. 
(उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5 शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)
 
12. आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला? या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या कुजतोय.
 
अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !
 
- सोशल मीडिया