1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (22:18 IST)

"मला कोणत्याही व्यक्तीकडून धमकी आलेली नाही "; सलमान खानने पोलिसांकडे नोंदवला जबाब

Famous Bollywood actor
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं होतं. सलीम खान जिथे मॉर्नींग वॉकला थांबतात त्या ठिकाणी हे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र मिळालं असून, त्यांनी ही माहिती होती. सलमानचा लवकरच सिद्धू मुसेवाला होणार असं या पत्रात म्हटलं असल्याचं पत्रात दिसत होतं. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली असून, वांद्रे पोलीस ठाण्यात  त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे.

सलमान खानने या प्रकरणात आज पोलिसांकडे जबाब नोंदवला. त्यावर सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात, अलिकडच्या काळात कोणत्याही व्यक्तीकडून धमकी, धमकीचे कॉल किंवा कोणाशीही वाद झाला नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.
 
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची रविवारी, 29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब पोलिसांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालासह 424 लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. आपल्या गाण्याच्या खास शैलीमुळे युवावर्गात सिद्धूचे मोठे चाहते होते.