सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (07:44 IST)

माझ्या हातात बेड्या पाहायच्या होत्या, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण झाली-उर्फी जावेद

बोल्ड फॅशनमुळे ओळखली जाणारी उर्फी जावेद   गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. होय, भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी उर्फीच्या जाहिर अंगप्रदर्शनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. उर्फीला विरोध नाही, पण तिचा नंगानाच सुरू आहे, त्याला विरोध आहे, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली आहे. ‘शी…ऽऽऽऽ  अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे  IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये...,’असं पहिलं  ट्विट त्यांनी केलं आणि इथून सगळं प्रकरण सुरू झालं. तेव्हापासून उर्फी चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. आता तर तिने एक बोल्ड व्हिडीओ पोस्ट करत चित्रा वाघ यांना नव्यानं डिवचलं आहे.
 
तुम्हाला माझ्या हातात बेड्या पाहायच्या होत्या, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण झाली...,’असं कॅप्शन देत उर्फीनं एक बिकिनी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor