1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (20:53 IST)

बाप्परे, नालासोपाऱ्यात जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू

मुंबईमधल्या नालासोपाऱ्यात एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना समोर आहे. नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास विनायक जाधव (वय 35) याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तसेच बिल्डिंग मधील लोकांनी नालासोपारा येथील सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
 
याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जीम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील 'द फिटनेस कार्डेस' या जिम मध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor