शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (19:52 IST)

पंत प्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आमदार जगताप यांना श्रद्धांजली

narendra modi
पिंपरी -चिंचवडचे नेते आणि आमदार लक्ष्मण जगताप  यांचे आज कर्करोगाने निधन झाले असून त्यांना राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आमदार जगताप यांना ट्विटरच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले आहे. त्यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी तसेच पुण्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसोबत आमच्या संवेदना आहे. ओम शांती.
आमदार जगताप गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची झुंझ आज अपयशी ठरली आणि त्यांचे आज सकाळी निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच गृहमंत्री अमितशाह यांनी देखील आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वहिली आहे.  
 
Edited By - Priya Dixit