गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:58 IST)

म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

mhada
म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी ग्राहकांना गुरूवारपासून (५ जानेवारी २०२३) नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार आहे. 
 
म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. ग्राहकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
 
या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे सोडतीत विजयी होणाऱ्याला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येणार आहे.
 
म्हाडाच्या घरासाठी आता एकच कायमस्वरूपी नोंदणी करावी लागेल.
कोणीही इच्छुक आता नोंदणी करू शकतो.
एखाद्याला ज्या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे ती जाहीर झाल्यानंतर त्याला अर्ज करता येईल.
या नोंदणीचा प्रारंभ गुरुवारपासून होणार आहे.
अशी करा नोदणी
 
एकाच कायमस्वरूपी नोंदणीस गुरुवार, ५ जानेवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल.
नव्या बदलानुसार, आता नोंदणी करतानाच इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे.
सामाजिक आणि इतर आरक्षित गटांतील इच्छुकांना संबंधित प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor