सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:47 IST)

मानसी टाटाकडे किर्लोस्कर समूहाची धुरा

mansi tata
Twitter
मुंबई : उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर समूहाची धुरा  मानसी टाटा हिच्याकडे दिली गेली असल्याची माहिती आहे. किर्लोस्कर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून मानसी टाटा यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने मानसी यांना किर्लोस्कर जॉइंटवेंचर बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्त केले आहे.
 किर्लोस्कर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मानसी टाटा यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. विक्रम किर्लोस्कर यांचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची एकुलती एक कन्या मानसी यांच्याकडेच कंपनीचे नेतृत्व सोपवले जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला.
मानसी टाटा परिचय
32 वषीय मानसी टाटा या वडिलांच्या कंपनीमध्ये कार्यकारी संचालक आणि सीईओ म्हणून आधीपासूनच कार्यरत होत्या. त्यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाईनिंगमधून पदवी प्राप्त केली आहे. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. 2019 मध्ये नोएल टाटा यांचा मुलगा नोवील टाटा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे चुलत भाऊ आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त मानसी यांना पेंटिंगचा छंद आहे. तेरा वर्षाची असतानाच त्यांनी पेंटींगचे आपले पहिले प्रदर्शन भरवले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor