शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (15:00 IST)

गोदावरी पात्रात बोटिंग करणारा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बुडाला

निफाड तालुक्यातील चांदोरी -सायखेडा शिवारातील गोदावरी नदीपात्रात जलतरण बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 7 सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी सव्वा आठ वाजेपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचे शोध कार्य सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने कळवले आहे. रवींद्र बाळकृष्ण भोईर वय वर्ष अंदाजे वीस हा सायखेडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो चाटोरी तालुका निफाड येथील असल्याचे समजते.
 
घटनास्थळी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक शोध कार्य करत असून यामध्येसायखेडा पोलीस, तसेच चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, सोमनाथ कोटमे,मधुकर आवारे, संतोष लगड यांचा समावेश आहे. सदरचा विद्यार्थी हा गोदावरी नदी पात्रात बोटिंग करणारा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे, दि ७ सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा विद्यार्थी बोटिंगचा सराव करत होता, ज्या ठिकाणी घटना घडली त्या परिसरात सुमारे 50 फूट खोल गोदावरी नदीचे पाणी पातळी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सांगितले. सकाळी सव्वा आठ वाजेपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचा गोदावरी नदीपात्रात शोध घेतला जात असून सकाळी 11 वाजेपर्यंत या शोध कार्याला यश आले नव्हते, दरम्यान घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक परिसरातील ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित आहेत. या घटनेमुळे सायखेडा व चाटोरी परिसरात शोककळा पसरली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor