शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (07:37 IST)

चाळीस आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात - गुलाबराव पाटील

Gulabrao Patil
चाळीस आमदारांनी बंड केले, चाळीस आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे. पुढच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठीच हे सुरू आहे, असा आरोप राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात भाषण करताना ते बोलत होते. 
 
आडवा केल्याशिवाय राहणार नाही
 
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, मी दलित, पीडित, शोषित, उपेक्षित सर्वांची काम करतो. त्यामुळे कोण खापर पंजोबा खाली येऊ दे, आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना इशारा दिला. मंत्री झाल्यामुळे सांभाळून बोलावं लागतं, काही बोलायल लागला की टीव्हीवाले उलट सुलट काहीही दाखवतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor