संबंधित माहिती
- नवसारी येथे बस आणि कारची धडक, नऊ ठार, अनेक जखमी
- Rishabh Pant Accident:ऋषभ पंतचा रस्ता अपघात कार डिव्हायडरला धडकली गंभीर दुखापत
- चीनने घेतला मोठा निर्णय, परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करणार नाही
- 'द किस्ट्रिक्सव्हेन' ही पृथ्वीवरील सर्वांत सुंदर रोड ट्रिप का आहे?
- लग्न लावून दिले नाही म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
शिखरजी बचावसाठी जैन समाज रस्त्यावर
गिरीडीह (झारखंड)येथील सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. सकल जैन समाजातर्फे सकाळपासून कोल्हापूर दसरा चौक येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक महामोर्चा काढण्यात आला. या मूक महामोर्चासाठी कोल्हापूर, बेळगाव, सांगली, विजापूर जिह्यातील जैन श्रावक, श्राविका, आबाल वृद्ध, वक,युवती,नोकरदार,शेतकरी,व्यावसायिक,व्यापारी व सर्व सकल जैन समाजातील व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.या महामोर्चात महिला भगव्या साडीत तर पुरुष पांढऱ्या कपड्यात दिसले.
झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे.परंतु सम्मेद शिखरजी हे समस्त जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेने याची पवित्रता नष्ट होणार आहे.सम्मेद शिखरजी हे पर्यटक क्षेत्र न राहता,तीर्थक्षेत्र म्हणून रहावे या मागणीसाठी,सकल जैन समाजाच्या वतीने मूक महामोर्चा काढण्यात आला. हा मूकमोर्चा दसरा चौक येथून,बिंदू चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गुजरी,महाव्दार रोड,पापाची तिकटी,लुगडी ओळ,फोर्ड कॉर्नर,बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता झाली.
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor