चीनने घेतला मोठा निर्णय, परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करणार नाही
चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. काही शहरांमध्ये 10 लाखांपर्यंतची प्रकरणे रोज येत आहेत. बीजिंगमध्येही परिस्थिती वाईट आहे. या सगळ्यात चीनने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियम बदलले आहेत.
चीन पुढील वर्षी 8 जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी क्वारंटाईन समाप्त करेल. सोमवारी येथे अधिकृत घोषणेमध्ये ही माहिती देण्यात आली. चीनसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे कारण तो त्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा उघडणार आहे. जवळपास तीन वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी राहिल्यानंतर तो या परिस्थितीतून बाहेर येईल.
देश ओमिक्रॉनच्या संसर्गाशी झुंज देत असताना या घोषणा करण्यात आल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, शी जिनपिंग प्रशासनाने सरकारविरोधी निषेधानंतर "शून्य-कोविड धोरण" मध्ये काही शिथिलता आणल्या.
Edited By - Priya Dixit