गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (11:09 IST)

स्पेनमध्ये भीषण अपघात, बस पुलावरून नदीत कोसळली ,सहा जणांचा मृत्यू

accident
स्पेनच्या वायव्य गॅलिसिया भागात एक मोठा अपघात घडला असून, पूल ओलांडताना बस नदीत पडली. या अपघातात सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
 
घटनास्थळी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांना दोरीने बांधून नदीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. चालकाने मद्यपान केले होते की अमली पदार्थांचे सेवन केले होते का, याचाही तपास पोलिसांनी केला. लेरगे नदीतील शोध आणि बचाव कार्य आता संपले असले तरी नदीत पडलेल्या बसलाही बाहेर काढण्यात आले आहे.
 
रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मुसळधार पाऊस आणि नदीच्या प्रवाहामुळे खूप त्रास झाला. जोरदार प्रवाहामुळे मृतांचे मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाला घाम फुटला. शनिवारी रात्री ही बस लुगो आणि विगो शहरादरम्यान जात होती. दरम्यान, बसचा अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार रात्री 9.30 च्या सुमारास बस नदीत पडली. त्यानंतर बस पाण्याने भरली आणि त्यातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला.
 
Edited By - Priya Dixit