गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (15:21 IST)

लग्न लावून दिले नाही म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

suicide
मुंबईत बोरिवलीच्या एल टी रोड परिसरात लग्न लावून दिले नाही म्हणून अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना बोरिवलीच्या एल टी रोड परिसरातील आहे. मयत मुलगी सदर भागात आई वडिलांसह राहत होती. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न ठरले होते. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे लग्न दोन महिन्यानंतर ती 18 वर्षाची झाल्यानंतर करण्याचे आई वडिलांनी निश्चित केले.

तिने लग्न लावून देण्याची मागणी केली मात्र ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला. या गोष्टीचा तिला राग आला आणि रागाच्या भरात येऊन तिने 23 डिसेंबर रोजी घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणाची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा तपास लावत आहे. 
 
Edited By- Priya Dixit