सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (20:15 IST)

आज मध्यरात्री पासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार

mahavitran
आज मध्यरात्री पासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करण्यासाठी संप पुकारला आहे. अडाणी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याचा हालचाली सुरु असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांचा 30 संघटनांनी संप पुकारला असून हा संप तीन दिनाचा राज्यव्यापी असेल. 

तब्बल महावितरणच्या 30 संघटना खासगीकरणाच्या विरोधात असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर 3 दिवसानंतर हा संप पुढे देखील चालू राहील. तसेच या काळात वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरकारची असेल असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 
 
Edited By - Priya Dixit