सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (09:28 IST)

गौतम अदानी-उद्धव ठाकरे यांची भेट

gautam adani
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर विविध क्षेत्रातील देश-विदेशातील पाहुणे आल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. मात्र बुधवार 21 सप्टेंबर रोजी झालेल्या एका भेटीमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
 
उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चाही झाली.
 
महानगरपालिकेच्या निवडणुका तसेच राज्यामधील सत्तांतरानंतर झालेल्या या भेटीने हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे.
 
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.