गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (09:18 IST)

भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला

Jayant Patil
शिंदे सरकार अस्थिर आहे. नवीन सरकार स्थापन होऊन आता इतके दिवस झाले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. बारामतीमध्ये येऊन भाजपला छुप्या पद्धतीने विकास बघायचा आहे. भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तसेच भाजपच्या नेत्या बारामती दौऱ्यावर आलेल्या आहेत. जीएसटीबद्दल त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली आहे, त्यांना जनता विचारेल आता, असे सांगत निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर जयंत पाटील यांनी टीका केली.
 
शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो
शिंदे गटातील आमदार खासगीत बोलताना सांगतात की, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो, असा टोला लगावताना, भाजपला आपल्या संख्याबळाची कायम भीती लागून राहिलेली आहे. आधी १२३ आमदार निवडून आले होते. मागच्या निवडणुकीत ती संख्या घटून १०५ वर आली आणि आता जे काही केले आहे, त्यामुळे जनता नाराज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तीच संख्या ८० ते ८५ पर्यंत खाली येते की काय, अशी भीती भाजपला सतावतेय, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.