गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (16:53 IST)

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन

famous actor Jitendra Shastri passed away
सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे.अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन झाले आहे. जीतू भाई या नावाने प्रसिद्ध असलेले जितेंद्र शास्त्री यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप सोडली होती.अभिनेता जितेंद्र शास्त्री हे 'ब्लॅक फ्रायडे' ते 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या  सहकलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 जितेंद्र शास्त्री चित्रपटाच्या पडद्यावरच नव्हे तर नाट्यविश्वातही प्रसिद्ध होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनय कौशल्य शिकले. जितेंद्र शास्त्री यांनी 'लज्जा', 'दौर', 'चरस', 'ब्लॅक फ्रायडे' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटासाठी त्यांचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटात त्याने नेपाळमध्ये बसलेल्या एका गुप्तचराची भूमिका केली आहे, जो एका कुख्यात दहशतवाद्याला पकडण्यात मदत करतो.